| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. उबेर चालकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी चालकाने दिलेल्या पत्त्यावर न जाता कार थेट इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर निर्जनस्थळी नेली. नंतर मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढली, असा आरोप मुलीने केला. या प्रकरणी उबेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी 14 वर्षांची असून, मंगळवारी (दि.13) 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. मुलीने दादर प्रभादेवी परिसरातून आपल्या घरी जाण्यासाठी उबेर अॅपद्वारे कॅब बुक केली होती. मात्र, चालकाने दिलेल्या पत्त्यावर न जाता कार दुसऱ्या ठिकाणी वळवली. उबेर चालकाने कार थेट इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर निर्जनस्थळी नेली. यानंतर उबेर चालकाने मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढली. घाबरलेल्या मुलीने थेट घर गाठले आणि कुटुंबाला सगळी हकिकत सांगितली. या प्रकाराची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी दादर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी उबेर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून पोलिसांनी उबेर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दादर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी चालकाचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.