| पनवेल | वार्ताहर |
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डच्या फुटपाथवरील बाकड्यावर सेक्टर नं.15, नवीन पनवेल या ठिकाणी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत.
ह्या अनोळखी इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, रंग गहुवर्णीय, डोक्याचे केस काळे पांढरे, उंची 5 फुट, शरीर सडपातळ, नाक सरळ, दाढी पांढरी काळी बारीक, अंगात पांढरा हाफ टी-शर्ट व त्यावर पुढील बाजूस जय भोले व शंकराचे चित्र आहे. तसेच निळसर रंगाचा मळकट बरमुडा, गळ्यात पंचरंगी धागा बांधलेला आहे. उजव्या हाताच्या पोटरीवर मंगेश व बदाम गोंदलेले आहे. तसेच दंडावर हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा सहा.पो.नि.पांडुरंग घागरे यांच्याशी संपर्क साधावा.