| पनवेल | वार्ताहर |
ट्रेलरने सायकलला धडक दिल्याने धीरज श्रीनारायण पांडे (21) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रेलर चालक इर्शादअली ईशाक अली खान याच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वावंजेतील धीरज पांडे हा जिओ पेट्रोल पंप येथे सिक्युरिटीचे काम करत होता. तो ड्युटी संपवून त्याच्या मित्राला भेटण्यासाठी धानसर टोल नाका पनवेल मुंब्रा हायवे रोडने सायकलवरून जात असताना ट्रेलर चालकाने त्याच्या सायकलला धडक दिली. या अपघातात धीरजच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्या. त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.