। अलिबाग । वार्ताहर ।
माणगाव येथे 2 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाची घटना घडली आहे. फिर्यादी रा.बोर्ले ता.माणगाव यांच्या घरासमोरील अंगणातुन फिर्यादींच्या मालकीची होंन्डा शाईन मोटार सायकल क्र.एम.एच.06 बी.एक्स. 8824 यावरुन फेरफटका मारण्याच्या निमित्ताने अपहरीत मुलगा वय- 02 वर्षे 03 महिने यास आरोपीत रा.बोर्ले ता.माणगाव याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन जबरदस्तीने पळवुन नेले आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि/श्री.वराळे हे करीत आहेत.