प्रवाशांसाठी खूशखबर! एसटीचे नवे वेळापत्रक जाणून घ्या

| अलिबाग | प्रतिनिधी |
सुट्टीचे औचित्य साधून एसटी महामंडळ रायगड विभागाने 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अलिबाग, पेण, कर्जत, महाड, पोलादपूर येथून 30 एसटी बसेस पनवेलपर्यंत सोडल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिली.

शनिवार 12 ऑगस्ट, रविवार 13 ऑगस्ट त्यानंतर मंगळवारी स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट, व 16 ऑगस्ट रोजी पारशी नुतन वर्ष म्हणून शासकिय सुट्टी असणार आहे. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसह अन्य जिल्हयात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी रायगड विभागातून 30 एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत.

अलिबाग- पनवेल, पेण – पनवेल, कर्जत -पनवेल, माणगाव – पनवेल, महाड – पनवेल, कर्जत – खोपोली, खोपोली – पनवेल अशा ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत. या सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे व्यवस्थापन करण्याच्या सुचना आगार व्यवस्थापकांना केले आहे. या बसेस प्रत्येक ठिकाणी थांबा घेणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना निश्चितस्थळी वेळेवर पोहचता येणार आहे.

Exit mobile version