निकम इंग्लिश स्कूलचा सत्कार

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील चव्हाण हॉस्पिटलचे डॉ. सचिन चव्हाण व डॉ. अक्षरा चव्हाण यांच्यातर्फे एस. एस. निकम इंग्लिश स्कूलचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्कूलचे संस्थापक डॉ. मदन निकम सर, शाळेचे विश्‍वस्त मंडळ, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व माजी नगरसेविका अंजली पवार व इतर मान्यवर यांच्याहस्ते हा संगीतमय सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात माणगावचे प्रसिद्ध संगीतकार प्रतिक निकाम व पखवाज वादक राकेश मेस्त्री आणि संगीत शिक्षक मनोहर पाटी यांच्या गणेशवंदनाने झाली. डॉ अक्षरा चव्हाण यांनी आभार मानले.

Exit mobile version