। खोपोली । प्रतिनिधी ।
पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया व केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा कुणाल पिंगळे यांनी 53 किलो वजनी गटात भारतात तिसरा क्रमांक पटकावला. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीने खालापूर तालुक्यासह घोडीवली गावाचे नाव रोशन झाले आहे. तसेच कुणालची जम्मू काश्मीर येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीने त्याने खालापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.