कुणबी भवन हॉल उद्घाटन समारंभ

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळाच्या कुणबी भवन हॉल नूतनीकरणाचा उदघाटन सोहळा सोमवारी (दि.26) सकाळी साडेअकरा वाजता कुणबी भवन माणगाव येथे संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्याला तालुक्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळातर्फे अध्यक्ष महादेव बक्कम, शैलेश भोनकर, रामभाऊ टेंबे, शांताराम भोरावकर, बाळाराम नवगणे तसेच सर्व समाज बांधवांनी केले आहे.

या उद्घाटन सोहळ्याला शेखर देशमुख, प्रभाकर उभारे, हुसेन राहटविलकर, सुभाष केकाणे, ज्ञानदेव पवार, बाबू खानविलकर, संगीता बक्कम, दिपक जाधव, मुक्तार वेळासकर, आनंद यादव, योगिता चव्हाण, अल्ताफदादा धनसे, जुबेर अब्बासी, शौकत रोहेकर, नितीन वाढवळ, उदय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

Exit mobile version