पागोटे येथे श्रमसंस्कार शिबीर

| उरण | वार्ताहर |

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पागोटे ता.उरण येथे सात दिवसाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या थीमवर आधारित या शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. सुशील शिंदे यांच्या करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बळीराम गायकवाड, कुणाल पाटील, प्रकाश नारायण भोईर, सतीश ज्ञानेश्‍वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध शिबिरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ग्रामस्वच्छता, आरोग्य विषयक जनजागृती व लोकसंख्या नियंत्रण जनजागृती याविषयी विशेष भर देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिस्त, आरोग्याच्या संदर्भात जागृती, नेतृत्व विकास कौशल्य, संवाद कौशल्य, संघटन कौशल्य इत्यादी विविध गुणांचा विकास करण्याच्या अनुषंगाने हे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर अत्यंत मोलाचे ठरले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात पूजा पाटील, वैष्णवी पाटील व शैलेश खंदारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे, अनुपमा कांबळे, विनिता तांडेल, पूजा गुप्ता व सदाभाऊ लेंडी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Exit mobile version