कामगारांच्या पगारवाढीसाठी श्रमिक संघ कटिबद्ध- रानवडे

| नागोठण | वार्ताहर |

भारतीय श्रमिक शक्ती पगारवाढीसह अन्य महत्वाच्या मागण्यांसह अन्य सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आधीचा करार संपण्यापूर्वी तीन महिने आधी व्यवस्थापनाला मागणीपत्र देऊन, वाटाघाटी करून, लवकरात लवकर करार पूर्ण करून, वाढीव पहिला पगार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही संघटनेच्या केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष कामगार नेते दीपक रानवडे यांनी दिली.

नागोठण्यातील इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याचवेळी नागोठणे रिलायन्स युनिटच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी संजय काकडे यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. नितीन शिवकर, अशोक भोय, प्रमोद मोरे, चंद्रकांत अडसुळे, प्रकाश मोरे, प्रवीण दबडे, मनोज पेढवी, किशोर शिर्के, सुरेश गायकर, शांताराम भोई, महेश धोत्रे, पंडित तुपकर, विनोद गोरे, दिनेश शिर्के, सुरेश कुथे, असलम चोगले आदींसह सल्लागार मारुती दांडेकर, सुभाष खराडे, अ‍ॅड. महेश पवार व कार्यकारिणी समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या केंद्रीय समितीवर सदस्य म्हणून चंद्रकांत अडसुळे व भारती सिंगासने तर, नागोठणे युनिटसाठी वेलशेत भागातून सचिवपदी सुधीर पारंगे यांची निवड करण्यात आली.

Exit mobile version