। पुणे । प्रतिनिधी ।
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील आठव्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. राजकुमार प्रजापती (45), असे मृत बांधकाम मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार प्रजापती हे हडपसर-सासवड रस्त्यावरील एका नियोजित गृहप्रकल्पात आठव्या मजल्यावर काम करत होते. यावेळी तोल जाऊन पडल्याने प्रजापती यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव अधिक तपास करत आहेत.