वीस अतिरिक्त गाड्यांची सोय,आरक्षणाची सुविधा द्या
| आगरदांडा | वार्ताहर |
पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुरुड आगारातून गणेशभक्तांच्या सोयीसाठी वीसहून अधिक जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. याचा फायदा मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नालासोपारा, ठाणे,पनवेल, रोहा, बोरिवली आदी भागातील गणेशभक्तांनाा होणार आहे. या जादा गाड्यांसाठी एसटीने आगाऊ आरक्षण सुविधा सुरु करावी,अशी मागणी गणेश भक्तांकडून होत आहे. याबाबतचे निवेदन महेश कारभारी यांनी विभागीय नियंत्रकाना दिले आहे.
जादा गाड्यांची मागणी
19 सप्टेंबर – रात्रौ 11.45, 20 सप्टेंबरः रात्रौ 11.45, 23 सप्टेंबरः मुरुड मुंबई गाडी रात्रौ 11.30,12/45, 24 सप्टेंबरः मुरुड मुंबई सकाळी 7/30, 2/30 (व्हाया भालगाव) मुरुड- मुंबई (व्हाया अलिबाग)2.15, 3. 30, 4. 45, 6. 15, 7.30, मध्यरात्री 12.30, 12.50, 12.55, 1.15, मुरुड बोरिवली 12.50, 2.35, 3.45, 5.45, मुरुड ठाणे 12.30, 5, मुरुड कल्याण 3. 30, मुरुड-पनवेल 1. 30, 25 सप्टेंबर 5,मुरुड मुंबई, 5.15 मुरुड पनवेल, 5.30 मुरुड पनवेल
वरीलप्रमाणे गाड्या आरक्षणास उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी- पेण विभागीय वाहतूक नियंत्रक -आशिष पाटील यांच्या कडे केली आहे. अशी माहिती महेश कारभारी यांनी दिली आहे.याला सकारात्मक उत्तर वाहतूक नियंत्रक यांच्या कडुन मिळाला आहे.लवकरच 20 गाड्या जादा मुरुड आगारात उपलब्ध होतील आणि लवकरच आरक्षणाला सुरवात होईल. अशी माहिती कारभारी यांनी दिली. मुरुड आगारात उपलब्ध असणाऱ्या गाड्यांचे आरक्षण संपले आहे.
आरक्षित गाड्या
24 सप्टेंबरः मुरुड ते मुंबई सर्व गाड्या फुल आहेतः सुटण्याच्या वेळा : 4.45, 6.30, 6.30(व्हाया भालगाव) 8.30,10 ,1,3 (व्हाया भालगावं) 5.30,11 मुरुड ते बोरिवली सर्व गाड्या फुल आहेत. सुटण्याच्या वेळा: 11 ,11.30,2,3, मुरुड ते ठाणे 6 , 4.30,मुरुड कल्याण 5.15, 7.30,12.30,2.30 या गाड्या बुकींग झाल्या आहेत.