लालपरीचा मार्ग वाहतुकीसाठी तयार

| उरण | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील गव्हाण, कोपर, जावळे, शिवाजीनगर, न्हावा, शेलघर, बामनडोंगरी या गावांचा गेल्या शंभर वर्षापासून रहदारीसाठी असलेल्या गव्हाणफाटा – गव्हाण मार्ग सिडकोच्या नवीन शहराच्या नियोजनामध्ये सिडको व्यवस्थापनाने पुसून टाकला. परंतु स्थानिक गावकऱ्यांची, प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची आस्था असेलला हा रस्ता सुरु राहावा अशी भावना होती. परंतु सिडको व्यवस्थापनाने ५ किलोमीटरचा वळसा वहाळ, उलवानोड मार्गे पर्याय सांगितल्यामुळे ग्रामस्थांमधे तीव्र संताप निर्माण झाला.

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून बैठका झाल्या पण सिडको–एनएचएआय व्यवस्थापनाने हा रस्ता सुरु करण्यास असमर्थता दर्शवीली. परंतु कर्तव्य कठोर नेतृत्व, प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वासाठी आपली ताकद दि.बा. पाटील साहेबांनंतर लावणारे झुंजार नेते महेंद्रजी घरत यांनी सिडको, एनएचएआय व्यवस्थापनाचा पिच्छा पुरवला. शेवटी राष्ट्रीय महामार्गाला भुयार देऊन – गव्हाणफाटा – गव्हाण रस्ता अबाधित ठेवण्याचे ठरले. यासाठी ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. सिडको व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दोन्ही व्यवस्थापन एकमेकांकडे चेंडू टोलवित होते शेवटी महेंद्रजी घरत यांनी आपला रुद्राअवतार दाखवताच दोन्ही व्यवस्थापनामार्फत निधी मंजूर करण्यात आला व आज २ वर्षानंतर हा मार्ग पूर्ण करण्यात आला.

पनवेल तालुक्यातील न्हावा – गव्हाण – बामनडोंगरी – शेलघर – कोपर – जावळे – शिवाजीनगर एसटी प्रवाशांची गेली २ वर्ष होत असलेली ससेहोळपट बंद होणार व लवकरच या मार्गावर लालपरी लवकरच धावणार तसे पत्र कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी पनवेल आगार प्रमुख श्री. चौरे साहेब यांची भेट घेवून दिले. लवकरच सर्वेक्षण करून एसटी सुरु करण्याचे आश्वासन आगार प्रमुख यांनी यावेळी दिले. राजकिय नेत्यांची इच्छाशक्ती असेल तर जनतेचे प्रश्न मार्गी लागतात हे खऱ्या अर्थाने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी अश्यक्य ते श्यक्य करून दाखवून दिले आहे.

Exit mobile version