। तळा । प्रतिनिधी ।
तळा शहरातील कुरुंडा येथील श्रीराम मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या कामाला जागा मालक विनय गोविलकर यांनी विरोध दर्शविला आहे. या रस्त्याचे काम सुरू होत असताना जागा मालक म्हणून विश्वासात घेऊन कोणतीही परवानगी न घेता परस्पर कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचा आरोप विनय गोविलकर यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच, या रस्त्यासाठी कोणत्याही फंडाची अथवा निधीची आवश्यकता नसून हा मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम स्वखर्चाने करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.