दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती
। शिमला । वृत्तसंस्था ।
शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवमंदिर दरडीखाली गाडलं गेलं. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथे सध्या बचावकार्य सुरू आहे.
ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती शिमलाचे एसपी संजीव कुमार गांधी यांनी सांगितलं की, भूस्खलनात एक शिव मंदिर कोसळलं. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. अनेक लोक अडकले आहेत. शिव मंदिराच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. परिसरात बचावकार्य सुरू आहे.
दरड कोसळणं सुरुच असल्याने बचावकार्यात अडथळे मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. मंदिरामध्ये भक्त पूजा करण्यासाठी पोहोचली होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. या परिसरात अद्यापही दरडी कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. स्थानिकांच्या मते, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं बोललं जात आहे.