। कुर्डूस । वार्ताहर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील मातृछाया क्रीडा मंडळ आयोजित स्व.प्रभाकर पाटील, पाटील चषक व्यावसायिक पुरुषगट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोपर येथील खुशबु आईस्किम संघाने विजय संपादित केला.
या स्पर्धेचे आयोजन कै.गो.जा पाटील क्रीडा नगरीत करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन माजी कबड्डीपटू रामचंद्र केणी यांच्या हस्ते झाले. यावळी सामाजिक कार्यकर्ते भगवान पिंगळे,विश्वास पाटील,विश्वनाथ पिंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी आ.पंडित पाटील, महाराष्ट्र कबड्डी असो.चे सरकार्यवाह अॅड.आस्वाद पाटील,जि.प.सदस्य चित्रा पाटील, जिल्हा कबड्डी असो.चे पदाधिकारी प्रमोद ठाकुर, प्रसाद भोईर,जगदीश पाटील, संदेश बैकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील नामवंत आठ व्यावसायिक कबड्डी संघात प्रत्येकी सात-सात साखळी सामने प्रेक्षणीय झाले.
अंतिम लढतीत कोपर आलिबाग येथील खुशबु-आईस्क्रिम संघाने पेण तालुक्यातील द्वितीय एंटर प्रा.संघाचा 25-16 गुणानी विजय साकारत या स्पर्धेतील विजेतेपद पटकाविले. तर द्वितीय एंटर प्रा.पेण च्या संघाने द्वितीय,जे.एस.डब्ल्यु. डोलवी संघाने तृतीय, प्रिमियर ताडवागळे, चर्तुथ क्रमांक पटकाविले.या विजेत्या संघाना रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई मिथुन मोकळ (व्दितीय एंटर प्रा) उत्कृष्ट पकड-नितेश थळे,तर सर्वोत्कृष्ट खेळाडू मितेश पाटील (खुशबु-आईस्क्रिम) यांना भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण रा.जि.परिषद सदस्य प्रभाकर पाटील (हरिओम), काल्हेरचे सरपंच हरेश जोशी, मातृछाया क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनिल पिगळे यांच्या हस्ते झाले.
याच कार्यक्रमात काल्हेर-ठाणे येथील राज्य अजिंक्यपद व निवड स्पर्धेत रायगड जिल्हा पुरुषगट संघात निवड झालेल्या अष्टपैलु खेळाडू गौरव पाटील,जिल्हा आदर्श शिक्षण पुरस्कार सन्मानित रंजिता पिंगळे तसेच राज्यस्तर क्रीडा पुरस्कार सन्मानित व पुन्हा एकदा रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्यवाह पदी व रायगड जिल्हा कबड्डी असो.च्या पंचमंडळ सदस्य म्हणून पुरुषोतम पिंगळे यांची निवड या वर्षात झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते वरील सर्वाना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मातृछाया क्रीडा मंडळाचे तसेच राज्यस्तरीय खेळाडु ओमकार पिंगळे, गौरव पाटील,संतोश पिंगळे,धनंजय पिंगळे,मच्छिंद्र पिंगळे, मिलिंद पाटील, अरविंद पाटील, संदिप सुतार, तर स्पर्धेचे सुत्रसंचालय वैभव पिंगळे, स्पर्धा समालोचन रुपेश डाकी, मनोज तांडळे, चेतन पाटील, भालचंद्र पाटील,संजय थळे,पंकज जाधव,मोहन बैकर जिल्हा असोसिएशनचे पंच कार्यरत होते.