सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील सेवाभावी सामाजिक संस्था सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे या संस्थेचा 7 वा वर्धापनदिन रविवार (दि.14) करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संस्थेचे स्फूर्तिस्थान दिवंगत सचिन तांडेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वर्धापनदिनचे औचित्य साधून आधुनिक काळाची गरज ओळखून रायगड जिल्हा प्राथमिक शाळा कळंबुसरे आवारात संस्थेमार्फत मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेराचे उदघाटन करण्यात आले. गेल्या काही वर्षापासुन अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेकडून राबविण्यात आले आहेत.

या उदघाटन प्रसंगी उपस्थित सरपंच उर्मिला नाईक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी सुंदर शब्दात संस्थेच्या कार्याबद्दल उद्गार काढले. तसेच, यावेळी उपसरपंच सारीका पाटील, सविता नाईक, प्रशांत पाटील, समीर पाटील, गजानन गायकवाड, महेश पाटील, अँड. निनाद नाईक, प्रकाश पाटील, महेश पाटील, पद्माकर पाटील, रत्नाकर केणी, प्रभूश्वर म्हात्रे, प्रविण पाटील, कैलास पाटील, बळीराम पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version