लघुपटाचा शुभारंभ

| पनवेल | वार्ताहर |

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील के.आ.बांठीया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आर्ट फॅक्टरी एन्टरटेन्मेंट पुणे निर्मित व स्व.दत्तात्रय पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या प्रेषित पवार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रयत्न’ या शालेय जीवनावर आधारित लघुपटाचे श्रीवर्धन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या लघुपटाचे चित्रीकरण बांठीया शाळेत झाले असून यामध्ये असलेले कलाकार हे बांठीया शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आहेत. या लघुपटाचे कथानक शालेय जीवनात मस्ती करणारे व अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी प्रेरणादायी आहे, असे मत मांडत आगरी शिक्षण संस्थेचे प्राचार्य पंकज भगत यांनी लघुपटाला शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version