| तळा । वार्ताहर ।
जिल्ह्यातील शेतकर्यांना रब्बी पिक विमा हप्ता रक्कम कमी करण्यात यावा यासाठी तळा तालुक्यातील गिरणे ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
तळां तालुक्यात भात शेती बरोबरच आंबा व काजू पिकाच उत्पन्न घेतले जाते. परंतु मागील वर्षा पासून जिल्हयातील शेतकर्यांना वीमा कंपनीकडून जास्त हप्ता आकारला जातो. रत्नागिरी मध्ये हेक्टरी 13,300 रुपये, सिंधुदुर्गमध्ये हेक्टरी 7000 रुपये मात्र रायगडमध्ये पिक वीमा हप्ता हा हेक्टरी 29,400 रुपये एवढा आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे वीमा हप्त्याची कमी किंमत करुन जिल्ह्यातील शेतकर्यांना न्याय मिळून द्यावा अशी विनंती गिरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती पायगुडे यांनी सदर निवेदनातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.