उरणमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत

। उरण । वार्ताहर ।

गुरुवारी पहाटेपासून उरण शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवार्‍यासह होणार्‍या पावसाचा जोर वाढल्याने उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उरणमध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणार्‍या पावसाच्या प्रमाणात बुधवार पासून वाढ झाली आहे. तर गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाची संततधार व अधून मधून जोराचा असा पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी तसेच मुलांना शाळेतून ने-आण करण्यासाठी जाणार्‍याना या पावसाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मध्येच ऊन पडत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा रेनकोट न घेताच गेल्याने भिजत परतावे लागत आहे.

खड्ड्याच्या प्रमाणात वाढ
उरणमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक मार्गावर असलेल्या खड्ड्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version