| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकारी जितेंद्र गजेंद्र पाटील यांना त्यांच्या प्रदीर्घ वर्षाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना रायगडतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय अधिकारी डॉ. रोशन पाटील व जिल्हा आरोग्य खाते संघटनेचे अध्यक्ष निलेश कार्लेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते पोयनाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषध निर्माण अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणे व दर्जेदार काम केले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटनेला मार्गदर्शन केले त्यामुळे संघटनेचा दर्जा उंचावला. यावेळी अलिबाग औषध भांडार प्रमुख सूर्यकांत चौधरी, पाचाड येथील औषधनिर्माण अधिकारी प्रथमेश पवार यांच्यासह इर्शालवाडी दुर्घटनेवेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यावेळी प्रशासनाचे अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख अतिथी उपस्थित होते.