नागेश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार

| अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांना रायगड प्रेस क्लबने खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केले. रायगड प्रेस क्लबचा 18 वा वर्धापनदिन 26 मार्च रोजी पोलादपूर-लोहारे येथील हॉटेल बालाजीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभास खा. सुनील तटकरे, कमलेश सुतार, शरद पाबळे, मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, प्रकाश कदम, मानसी चेऊलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागेश कुलकर्णी यांनी दै. मुंबई सकाळ, दै. नवशक्ती, दें, सागर, दै. रत्नागिरी टाइम्स या दैनिकांचे अलिबाग प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. तसेच 1980 पासून आजपर्यंत गेली सतत 42 वर्षे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघात सहचिटणीस, सरचिटणीस आणि उपाध्यक्ष कार्यरत असून गेली 22 वर्षे जिल्हा पत्रकार संघात उपाध्यक्षपद भूषवित आहेत. गेली 40 वर्षे ग्रंथालय चळवळीत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version