उपोषणानंतरही स्थानिकांचे प्रश्न जैसे थे

सहा महिने उलटलून बहुतेक मागण्या अद्याप अपूर्ण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या टाटा पॉवरच्या धरण प्रकल्पाविरोधात डिसेंबर 2025 मध्ये कर्जत परिवर्तन आघाडीच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषण आणि आंदोलनानंतरही स्थानिकांच्या बहुतांश समस्या कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या टाटा पॉवरच्या धरण प्रकल्पाविरोधात डिसेंबर 2025 मध्ये कर्जत परिवर्तन आघाडीच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषण आणि आंदोलनानंतरही स्थानिकांच्या बहुतांश समस्या कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आंदोलनाला सहा महिने उलटूनही केवळ मोजक्याच मागण्यांवर कार्यवाही झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

भिवपुरी परिसरात सुमारे 200 एकर क्षेत्रात टाटा पॉवरकडून जलसाठा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे घरांना तडे जाणे, ब्लास्टिंगमुळे नुकसान, रोजगार, पाणीपुरवठा आणि पुनर्वसन यांसारख्या विविध प्रश्नांवर स्थानिकांनी आवाज उठविला होता. त्यासाठी 23 डिसेंबर 2025 रोजी टाटा पॉवरच्या प्रवेशद्वारासमोर दिवसभर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर कंपनीने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत केवळ वैद्यकीय दवाखान्याची सुविधा सुरू करण्यात आली असून, तोही शनिवार-रविवारी बंद असतो. उर्वरित महत्त्वाच्या मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

धनगरवाडा व आदिवासी कातकरी वस्तीचे पुनर्वसन, ब्लास्टिंगमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची भरपाई, बंद पडलेल्या बोअरवेल व पाणीपुरवठ्याची भरपाई, माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीचा मोबदला, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, शेती नुकसानीची भरपाई, फिरता दवाखाना, सौर ऊर्जा सुविधा, शाळांची देखभाल आणि ग्रामीण रस्ते विकास यांसारख्या अनेक मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश मागण्यांवर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांची अपेक्षाभंग झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

पावसाळा तोंडावर आला असताना धनगरवाडा आणि इतर वस्ती भागातील प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनावेळी अनेक मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते.

तानाजी तुरडे
स्थानिक नागरिक

Exit mobile version