| पेझारी | वार्ताहर |
कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष लोकनेते अॅड. दत्ता पाटील तथा दादा यांचा पुण्यस्मरण दिन को.ए.सो ना.ना. पाटील संकुलामध्ये ज्येष्ठ संचालक पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दादा म्हणजे बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि दातृत्व यांचा जणू त्रिवेणी संगम. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा कायम राखली जीवनाच्या अंतापर्यंत स्वार्थ त्यांना कधीही शिवला नाही. शेवटपर्यंत गोरगरीब, श्रमजीवी, कामकरी जनतेच्या हितासाठी झटले. खेडूतांच्या, गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून को.ए.सो. व जनता शिक्षण मंडळामार्फत ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचविणारे दादा यांच्या पुण्यस्मरणदिनी जि.प. सदस्या चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, को.ए.सो.चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, शाळा समिती सदस्य यशवंत पाटील, प्रकाश म्हात्रे, सुनील राऊत, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक, दादांचे चाहते, संकुल प्रमुख डी.पी. कुलकर्णी, सत्र प्रमुख शशिकांत पाटील, विकास पाटील, संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दादांच्या स्मारकातील प्रतिकृतीस अभिवादन केले.