| अलिबाग | प्रतिनिधी |
रोह्याच्या राजकारणातील ढगधगती तोफ, सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे ज्येष्ठ संचालक, रा.जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती लोकनेते मनोहर (भाईसाहेब) पाशिलकर यांचे शनिवारी (दि.१४) रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर धाटाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत रविवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






