मानवनिर्मित वणवे वृक्षांच्या मुळावर

जैवविधता संकटात; वणवे रोखण्याचे आव्हान

| माणगाव | प्रतिनिधी |

लांबलेल्या पावसाने हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा वाढू लागल्यानंतर अचानक काळे दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर माळरानावर पसरलेले गवत सुकू लागले आहे. या सुकणार्‍या गवताना अचानक वणवे लागत असून, मानवनिर्मित या वणव्यांमुळे डोंगरांचा रंग काळा दिसत आहे. एरवी हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा सुरू होताच वणव्यामुळे काळे दिसू लागल्याने डोंगरांची शोभा हरवत चालली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उन्हाची काहिली वाढत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच डोंगरांना अचानक आग लागून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वृक्षराजांनी समृद्ध असलेल्या या डोंगररांगा वणव्यामुळे ओसाड, उजाड होत आहेत. या वणव्यात मोठ्या वृक्षांच्या बरोबरीने लहान रोपांचीही हानी होत आहे. आंबे, काजू यासारखी फळझाडे करपून जात आहे. यामुुळे फळपीक मोहोर होरपळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वन्यप्राण्यांनाही या वणव्याच्या मोठ्या प्रमाणात झळा बसत असून, त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. वेळीच वणवे रोखले नाहीत तर असणारी जैवविविधता धोक्यात येत आहे.

वणव्यांमुळे निसर्ग सौंदर्य बिघडत आहे. पर्यावरणाची आतोनात हानी होत आहे. त्यामुळे जनजागृती करून वणवे लावण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.

राम मुंढे,
पर्यावरणप्रेमी, अभ्यासक

गेल्या काही दिवसांपासून वणवे लागत असल्याने आंबे, काजू पिकांचे नुकसान होत आहे. नुकताच मोहोर येऊ लागला आहे. हा मोहर करपून जाण्याची श्यक्यता आहे. वनसंपत्तीबरोबर पशुपक्ष्यांना या वणव्याचा त्रास होत आहे. वेळीच हे वणवे रोखले पाहिजे.

प्रदीप लांगी
निसर्गप्रेमी
Exit mobile version