अलिबाग बाजारपेठेतुन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3:30 वा. सुमारास अलिबाग बाजारपेठ येथून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले. याबाबतची तक्रार तिच्या आईने अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे.
अलिबाग बाजारपेठ येथील सदर फिर्यादीची मुलगी दुपारी 15.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर कोणास काही एक न सांगता बाहेर पडली. तिला कोणीतरी अज्ञात इसमाने दुपारी 3.30 ते 5.30 वा चे दरम्यान म कोणीतरी इसमाने फुस लावुन पळुन नेली.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सोनकर हे करीत आहेत.

Exit mobile version