। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई संचालित श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयात शिवजयंती साजरी केली गेली. यानिमित्त विद्यार्थिनींसाठी निबंधस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा आणि भित्तिपत्रक या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
निबंधस्पर्धेत विशाखा हेदुकर प्रथम क्रमांक, तर स्नेहा चौकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी रिसबूड प्रथम क्रमांक, तर युक्ता माने आणि वैष्णवी सानप यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. भित्तिपत्रक स्पर्धेमध्ये ईशिता मोरे प्रथम क्रमांक, तर स्नेहा चौकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.