। पोलादपूर । वार्ताहर ।
शारदीय नवरात्रौत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्या देवीभक्तांसाठी पोलादपूर नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका संगिता इंगवले यांनी महाड एस.टी.आगाराकडे मागणी केल्यानुसार एस.टी.बसच्या विशेष फेर्या सुरू झाल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होत असलेल्या या महाड ते प्रतापगड एस.टी. बसच्या दररोज दोन फेरीचे दसर्यापर्यंतचे वेळापत्रक महाड एस.टी.आगाराकडून जाहिर करण्यात आले आहे. यानुसार पहिली फेरी सकाळी महाडमधुन निघण्याची वेळ सकाळी 7 वाजता, पोलादपुर निघण्याची वेळ सकाळी साडेसात वाजता, प्रतापगडावरुन निघण्याची वेळ साडेअकरा वाजता, दुसरी फेरी महाडमधून निघण्याची वेळ दुपारी 2 वाजता, पोलादपुर निघण्याची वेळ दुपारी अडीच वाजता, प्रतापगड वरुन निघण्याची वेळ सायंकाळी साडेपाच वाजता असे वेळापत्रक निर्धारित करण्यात आले आहे.
महाड-प्रतापगड एस.टी सुरु
