अखिल भारतीय कोळी समाज उपाध्यक्षपदी महादेवबुवा शहाबाजकर

। नवी मुंबई । वार्ताहर ।
अखिल भारतीय कोळी समाजाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महादेवबुवा शहाबाजकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय कोळी समाजाच्या 21 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडक करण्यात आली.

दरम्यान, अजित पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री भानुपताप वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय कोळी समाजाचे कार्य कांती कोळी यांच्या सल्ल्यानुसार करणार असल्याचे नवनिर्वाचित राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेवबुवा यांनी सांगितले.

अखिल भारतीय कोळी समाजाचे विद्यमान राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद हे मागील तीन टर्म अध्यक्ष होते. हे वर्ष संस्थेचे 50 वे वर्षे आहे. गोल्डन जुबली वर्ष सूरत येथे करण्याचे अध्यक्ष अजित पटेल यांनी घोषित केले. शहाबाजकर यांच्या निवडीचे राज्यातील कोळी समाज, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व भजनकार, कीर्तनकारांकडून स्वागत केले जात आहे.

Exit mobile version