महाराष्ट्र कबड्डी लीग मे महिन्यात

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मे 2025 मध्ये महाराष्ट्राची कबड्डी लीग घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दिली आहे. पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात 23 ऑक्टोंबर रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत या विषयावर धोरणात्मक चर्चा करून मंजुरी घेण्यात आली होती. याबाबत चांदेरे यांनी सांगितले की, लीगकरिता पुरुष आणि महिलांचे असे एकूण 16 संघ तयार करण्यात येतील. यासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल. राज्यातील प्रो कबड्डी लीग खेळलेल्या खेळाडूंचाही या लीगमध्ये समावेश असेल. इतर राज्यातील एका खेळाडूला प्रत्येक संघात स्थान देण्यात येईल. राज्यातील पुणे आणि मुंबई या दोन शहरांत ही स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धा साधारणत: पुढील वर्षाच्या मे महिन्यात घेण्याचा संघटनेचा मानस आहे. लीगचे नियम आणि अटी लवकरच निश्‍चित करण्यात येणार आहेत. तसेच, यापुढे खाजगी संस्थांना कबड्डी लीग घेण्यासाठी राज्यात परवानगी देण्यात येणार नसल्याचेही चांदोरे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version