महिला आघाडी ही शिवसेनेची ताकद: जोशी

| नेरळ | प्रतिनिधी |

शिवसेनेत महिला आघाडी ही पक्षाची खरी ताकद असून, कोणी किती बोलले तरी शिवसेनेची महिला आघाडी आजही भक्कम आहे, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी केले. महिला आघाडी ही शिवसेनेची ताकद असून, सर्व महिला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देऊन पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्यावा, अशी सूचना जोशी यांनी केली. नेरळ शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभामध्ये सुवर्णा जोशी बोलत होत्या.

सालाबादप्रमाणे शिवसेना ठाकरे नेरळ शहर शाखेच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहर मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाला महिला आघाडीच्या रायगड जिल्ह्याच्या संघटिका कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी तसेच कर्जत पंचायत समिती माजी सभापती सुजाता मनवे, कर्जत तालुका संघटिका करुणा बडेकर, तालुका संपर्क प्रमुख सुमन लोंगले, उप तालुका संघटिका कल्पना चव्हाण, तसेच सुलभा भोसले, प्रीती देसाई, नीता हनुमंते, ग्रामपंचायत सदस्य शारदा साळेकर, पार्वती पवार, पूजा घोंडविदे, मेघा बैकर, रेश्मा शिंदे, राखी गुरव, माधुरी पवार, अंजली, प्रीती आढाव, रुचिता वझरकर, सुजाता मोहिते, रश्मिका शेलार, सुषमा लोंगले आणि अक्षता उतेकर आदी महिला पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

या कार्यक्रमाला उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, युवासेना कर्जत तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे, उप तालुका संघटक सुधाकर देसाई, विभागप्रमुख अल्पेश मनवे, संपर्क प्रमुख चिंधु बाबरे, संदेश लाड, महेंद्र शिंदे, उप शहर प्रमुख बाबू चव्हाण अरुण सालेकर, संतोष सारंग, तसेच राहुल भाटकर, ओमकार खडे, प्रवीण बाबरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version