मेकअप आर्टिस्टचे निधन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारी यांचे निधन झाले आहे. वेस्ट इंडिजमधील एका हॉटेलमध्ये हा अपघात झाला. स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. स्विमिंग पूलमध्ये मित्रांना तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. फैयाजला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 21 जून रोजी सायंकाळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version