सर्वाधिक 2666 खाती उघडून प्रथम स्थान
| माणगाव | प्रतिनिधी |
भारतीय डाक विभागाने संपूर्ण भारतभर सप्टेंबर 2022 मध्ये नवीन खाते उघडणे अभियान राबवण्यात आले होते. रायगड विभागात भारतीय डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांच्या माणगाव पोस्ट ऑफिसने 2661 खाते उघडून महाराष्ट्र डाक सर्कलमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे. डाक विभागाकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन माणगाव पोस्ट ऑफिसला गौरविण्यात आले आहे.
अभियान यशस्वी करण्याकरता माणगाव उपविभागीय डाक निरीक्षक धनराज उमाळे यांच्यासह पोस्ट मास्तर शिलवंत यांचे नियोजनपूर्ण मार्गदर्शन लाभले. याबाबतीत डाक सहाय्यक श्रीनिवास येरावार, विशाल सुबोध कासारे, केशव मनवल, सत्यजित साहू यांच्यासह पोस्टमन राजेंद्र कदम, प्रशांत जूमारे, चंद्रकांत सपकाळ, सागर भोरावकर, नंदकुमार शिंदे यांचे सहकार्य लाभले तसेच डाक आवेक्षक संजय पालकर व किशोर नाडकर यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे नंदकुमार जोशी, डाक प्रतिनिधी मीरा मेहता, डाकसेवक सुनील लहाने व सर्व शाखा घरातील कर्मचारी वर्गाने विशेष केले.
माणगाव पोस्ट ऑफिसमध्ये टपाल जीवन विमा, सुकन्या समृद्धी योजना ,किसान विकास पत्र ,राष्ट्रीय बचत पत्र, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, आधार नोंदणी केंद्र यासारख्या विविध योजनांचा लाभ भेटत आहे. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी माणगाव पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा असे आवाहन माणगाव पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर श्री. शिलवंत यांनी आहे.