| पेण | प्रतिनिधी |
विंग्स नेटवर्स सर्व्हिसचे मालक अविनाश पांडुरंग पाटील यांच्या नावे धनादेश क्रमांक 00306 हा बाराशे रुपयांचा गर्जा रायगड या खात्याचा चेक दिला होता. मात्र, बँकेने या बाराशे रुपयांच्या चेकच्या बदल्यात नऊ हजार दोनशे रुपये गर्जा रायगडच्या खात्यावरुन कट करुन अविनाश पांडुरंग पाटील यांच्या खात्यावर जमा केले. याचा मेसेज जेव्हा गर्जा रायगडचे संपादक संतोष पाटील यांना आला, त्याच्या दुसऱ्या दिवशी विचारायला गेल्यावर बँकेतील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली.
मात्र, बँकेच्या शाखाप्रमुखांनी सोमवारपर्यंत कट झालेले पैसे जमा होतील, असे सांगितले होते; परंतु सोमवार, दि. 1 डिसेंबर रोजी शाखा प्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, चेक क्लिअरीकर विभागाला मेसेज टाकला आहे. बुधवारपर्यंत रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल. असे असले तरी बँक हलगर्जीपणा कशी करु शकते. चेक बाराशे रुपयाचा आणि त्याबदल्यात नऊ हजार दोनशे रुपये गर्जा रायगडच्या खात्यातून डेबीट करते याचा अर्थ बँकमधील कर्मचारी हे बेजबाबदार व कर्तव्यशून्य आहेत असेच म्हणावे लागेल. तरी या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोरातील कठोर पावले वरिष्ठांनी उचलावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
बडोदा बँकेत चेकच्या रकमेमध्ये हेराफेरी
