। पालघर । प्रतिनिधी ।
पंतगांच्या मांजाने एका दुचाकीस्वाराचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.12) सायंकाळच्य सुमारस वसईच्या वसईतील विक्रम डांगे हे आपल्या पत्नी मुलासह फिरण्यासाठी जात होते. यावेळी दुचाकीवरुन जात असताना पतंगाचा मांजा विक्रम यांच्या गळ्यात अडकला. दरम्यान, पत्नीने वेळीच मांजा काढल्यामुळे अनर्थ टळला आहे. मात्र, विक्रमच्या गळ्यावर खोल जखम झाल्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला होता. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, त्यांच्या गळ्याला 9 टाके पडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मांजाने दुचाकीस्वाराचा गळा चिरला
