| उरण-चिरनेर | प्रतिनिधी |
उरण नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी संतोष पवार व ॲड. निरंतर सावंत यांनी मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. ॲड. निरंतर सावंत यांनी, मराठी भाषा जास्तीत जास्त बोलणे व ती भाषा जिवंत ठेवणे हे आपल्या सर्व मराठी लोकांचे कर्तव्य आहे. तर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी सर्वांनी आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये पाठविणे जरुरीचे आहे. तसेच, आपण दुर्लक्ष केल्यामुळे मोडी लिपी व संस्कृत भाषा कशी लोक पावली याची त्यांनी उदाहरणे दिली. त्यामुळे भाषा बोलणे, ती टिकवणे व आपल्या मातृभाषेतील संवाद आपण आपल्या स्वतः पासूनच वाढवणे हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
मीनाताई ठाकरे ग्रंथालयात मराठी भाषा दिन साजरा
