| रसायनी | वार्ताहर |
ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन या मागणीसाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवस्थानी ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा मोर्चा जाणार आहे.
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान यांच्या विभागांतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक म्हणून 29 ग्रामपंचायतींमधून 20 हजार कर्मचारी गेली 12 वर्षे काम करीत आहेत. अद्याप त्यांना कायमस्वरुपी अथवा किमान वेतन देऊन ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा दिला नाही, त्यामुळे 12 वर्षे नोकरीचे फुकट जाणार आहेत. या कर्मचार्यांनी कोरोना काळात अतिशय प्रामाणिक काम केले आहे. सुधारीत आकृती बंधानुसार, ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोर्चाचे आयोजन केले आहे, असे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. रायगड जिल्हा व खालापूर तालुका परिचालक संघटनांमधील संगणक परिचालकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.