। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील ओरियन मॉलच्या मागे एका इसमास गळा आवळून ठार मारण्यात आले होते. या गुन्ह्याचे कोणतेही धागेदोरे नसताना पनवेलच्या गुन्हे शाखा कक्ष पथकाने तांत्रिक तपासाआधारे पनवेलमधून एका आरोपीला अटक केली आहे. असे असले तरी मयत इसमाची अजूनही ओळख पटलेली नाही.
शहरातील ओरियन मॉलच्या मागील बाजूस असलेल्या झाडीमध्ये एका इसमाला काही दिवसांपूर्वी बेल्टच्या सहाय्याने गळा आवळून ठार मारण्यात आले होते. याबाबतचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे वपोनि उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, मानसिंग पाटील, प्रताप देसाई, अजित कानगुडे, उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, मधुकर गडगे, प्रशांत काटकर, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, रुपेश पाटील, इंद्रजित कानू, दिपक डोंगरे, निलेश पाटील, सागर रसाळ, पो.ना.अजिनाथ फुंदे, लवकुश शिंगाडे, अजित पाटील, विक्रांत माळी आदींच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपी धिरज राजू शर्मा (27) याबाबत माहिती मिळाली. यानुसार त्याला ताब्यात घेतले असता दोघांमध्ये दारु पित असताना वाद होऊन बाजूला पडलेल्या बेल्टच्या आधारे गळा आवळून व्यक्तीला ठार मारले आहे. या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.