| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद यश संपादित केले आहे. या मविआमध्ये शेकापचे वर्चस्व प्रस्थापित करीत बाजार समितीवरील आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण 159 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शेकापने सर्वाधिक 95 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस 13, राष्ट्रवादी 20, ठाकरे गट 3 आणि शिंदे गट 20 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत.
अलिबाग
शेकाप 16
काँग्रेस 1
शिवसेना ठाकरे 1
मुरूड
शेकाप 12
काँग्रेस 2
राष्ट्रवादी 3
कर्जत
शेकाप 10
शिवसेना ठाकरे 1
राष्ट्रवादी 5
शिवसेना शिंदे 2
खालापूर
शेकाप 15
राष्ट्रवादी 1
शिवसेना शिंदे 1
पनवेल
शेकाप 15
काँग्रेस 1
शिवसेना ठाकरे 1
रोहा
शेकाप 12
राष्ट्रवादी 6
माणगाव
शेकाप 12
राष्ट्रवादी 4
शिवसेना शिंदे 2
महाड
शेकाप 3
काँग्रेस 8
राष्ट्रवादी 1
शिवसेना ठाकरे 1
शिवसेना शिंदे 5