। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेची एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सोमवारी (दि. 1) दुपारी तीन वाजल्यानंतर माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत सकाळी अकरा वाजता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डाॅ. दीपक माळी यांनी दिली.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली हाेती. या परीक्षेचा निकाल आठ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आला. दरम्यान, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना साेमवारी परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप केले जाणार आहे. नऊ विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना साेमवारी सकाळी अकरा वाजता प्रमाणपत्र वाटप केले जाईल. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप केले जाणार आहे.
उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप
