। श्रीवर्धन । संतोष चौकर ।
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर रोडवर असलेल्या गालसुरे या गावामध्ये एका 28 वर्षीय विवाहित महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना गावाच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळील ओढ्यामध्ये घडली. याबाबत श्रीवर्धन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव सुहेली सुहास रहाटवळ (वय 28) असे असून तिन कोणत्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नसून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या महिलेला औषधोपचारासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. याबाबत श्रीवर्धन पोलीस अधिक तपास करीत आहेत.