| महाड | वार्ताहर |
विवाहित महिलेसोबत अश्लील संभाषण तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी आरोपी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना महाड तालुक्यात नुकतीच घडली आहे.
तक्रारदार महिला ही विवाहित असून, महाड तालुक्यातील रहिवासी आहे. या महिलेला एका 40 वर्षीय विवाहित इसमाने ऑक्टोबर 2024 महिन्यातील एके दिवशी मध्यरात्री ही महिला विवाहित आहे, हे माहीत असताना देखील तिच्या घराजवळ येऊन तू मला आवडतेस असे बोलून ही गोष्ट तू कुणाला सांगू नकोस आणि तुझ्या नवऱ्याला पण सांगू नकोस असे असभ्य संभाषण केले. विवाहित महिलेने ही बाब तिचे पती व सासूला सांगितल्याने आरोपी इसमाच्या पत्नीने 22 फेब्रुवारी रोजी या विवाहित महिलेला तु ही गोष्ट मला का नाही सांगितलीस ! असे बोलून शिवीगाळ केली. त्याचवेळी आरोपी इसम देखील तिथे आला आणि तुला ही गोष्ट मी कुणाला सांगू नकोस हे सांगून सुद्धा तू ही गोष्ट नवऱ्याला का सांगितलीस ! असे बोलून शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत महिलेने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.