मारूती भोईर यांचे निधन

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते मारूती होनाजी भोईर यांचे मंगळवारी (दि.14) वयाच्या सुमारे 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. मारूती भोईर हे समाजामध्ये नेहमीच सक्रीय राहून सामाजिक बांधिलकी जपून कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, एक बहिण, दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी (दि.23) तर अंतिम धार्मिकविधी रविवारी (दि.26) देवकान्हे येथील राहत्या निवासस्थानी होणार आहे.

Exit mobile version