| पुणे | प्रतिनिधी |
कात्रज-गुजारवाडी रोड येथील साई इंडस्ट्रियल एरिया मधील भूषण एंटरप्रायझेस या इलेक्ट्रिक बाईक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग संध्याकाळी चारच्या सुमारास आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गंगाधाम, कात्रज, कोंढवा बुद्रुक येथून दहा अग्निशमन बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दाखल झाले. या आगीत 150 अर्धवट तयार दुचाकी जळून खाक झाल्या असून, दुचाकीचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.