मास्टर-ब्लास्टरची नवीन व्यवसायात एन्ट्री

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सचिन तेंडुलकरने स्पोर्ट्स ऍथलेझर ब्रँड लॉन्च करण्यासाठी स्विगी इंस्टामार्टचे माजी प्रमुख कार्तिक गुरुमूर्ती यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. स्विगीचे आणखी एक माजी कार्यकारी करण अरोरा हे व्यवसायाचे तिसरे सह-संस्थापक असतील, असे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे.

व्हेंचर फंड व्हाईटबोर्ड कॅपिटलचा पाठिंबा असलेला हा उपक्रम 10 अ‍ॅथलीझर प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत काम करेल. ज्यात तेंडुलकर आणि व्हाईटबोर्ड कॅपिटल दोघेही बोर्ड सदस्य आहेत. या ब्रँड अंतर्गत क्रिकेट आणि बॅडमिंटनसारख्या खेळांसाठी उत्पादने लाँच केली जाण्याची शक्यता आहे. सचिनची नवीन कंपनी नाईकीसारख्या अग्रणी ब्रँड्स सोबत स्पर्धा करण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये सचिनचे नाव घेतले जाते. नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, 2023 पर्यंत त्याची एकूण संपत्ती 175 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1436 कोटी रुपये) होती. त्याच्या करोडोच्या संपत्तीवरून तुम्ही सचिनच्या ब्रँड व्हॅल्यूची कल्पना करू शकता.

सचिन आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान तेंडुलकरच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे ब्रँड एंडोर्समेंट. तो आजही एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. सचिन पेप्सी, कॅस्ट्रॉल इंडिया, अनाकॅडमी, बूस्ट, सनफिस्ट, एमआरएफ टायर्स, ल्युमिनॉड इंडिया, अविवा इन्शुरन्स, बीएमडब्ल्यू, आदिदास, व्हिसा, सान्यो, फिलिप्स, स्पिनी, बीपीएल इत्यादी अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती करतो. ब्रँड एंडोर्समेंटमधून तो दरवर्षी 20 ते 22 कोटी रुपये कमावतो. सचिन तेंडुलकरचा व्यवसाय केवळ जाहिरातींमधूनच नाही तर अनेक व्यवसायांतूनही चांगली कमाई करतो. तो कपडे आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय करतो. त्याचा कपड्यांचा ब्रँड ट्रू ब्लू 2016 मध्ये यूएस आणि इंग्लंडमध्ये लॉन्च झाला होता. त्याची मुंबई आणि बेंगळुरू येथे सचिन आणि तेंडुलकर नावाची रेस्टॉरंट्स देखील आहेत जी खूप लोकप्रिय आहेत.

Exit mobile version