पर्यटकांनी माथेरान गजबजले

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असेलेले माथेरान या पर्यटनस्थळाला बाहेरील येणार्‍या पाहुण्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरवर्षी गोकुळ अष्टमीला माथेरान गुजरातवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. यावर्षी सुध्दा या पर्यटकांनी माथेरान हे पूर्ण गजबजले आहे.

दरवर्षी गुजरात वरून पर्यटक हे गोकुळ अष्टमीला आणि दीपावली या दोन्ही सणाला पसंती देत असतात. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे माथेरान पर्यटनस्थळाला गोकुळ अष्टमी, दिपावली या दोन्ही सण हे कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद होता. त्यामुळे येथे पर्यटकांनी पसंदी दिली नव्हती. तर या वर्षी गोकुळ अष्टमीला सुट्टी जाहिर केली नसली तरी गुजराती पर्यटकांनी माथेरानला भरभरून प्रतिसाद दिला आहे. माथेरान घाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना कराठी ते दस्तूरी नाका हे एक किलोमीटरचे अंतर चालत जावे लागत होते.

Exit mobile version