माथेरान स्टेशन ते अमन लॉज नॅरोगेज मार्ग प्रकाशमय

| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान स्टेशन ते अमन लॉज हा नॅरोगेज मार्ग प्रकाशमय झाला आहे. येथे येणारे पर्यटक हे दस्तुरी नाका येथून बहुसंख्येने पायी चालत जात असतात. त्यात ते रात्री अपरात्री कधीही येत असतात. रात्री येणार्‍या पर्यटकांना नॅरोगेज मार्गाने जाताना त्या मार्गावरील व्हिलेजचे दिवे बंद होते. त्याबाबत नागरपरिषदेकडे जागरूक नागरिकांनी सूचना केल्यानंतर पालिकेने तत्परता दाखवत नॅरोगेज मार्गावरील दिवे पुन्हा उजळविण्याचे काम केले आहे.

स्थानिकांना रात्री, अपरात्री आल्यानंतर देखील दिव्यांच्या प्रकाशाचा फायदा होणार आहे. तर पहिल्यांदा माथेरानमध्ये येणार्‍या पार्यटकांना अंधारामुळे घाबरायला होणार नाही अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.त्यांनी सर्व दिवे प्रकाशाने उजळले आहेत किंवा नाहीत याची पाहणी केली.

Exit mobile version