। मुंबई । प्रतिनिधी ।
निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा रवी जाधव हे नाव मराठी कलाविश्वासाठी नवीन नाही.आजवर त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. सतत चेहर्यावर स्मितहास्य असणार्या दिग्दर्शक रवी जाधव याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी जाधव यांची आई शुभांगीनी जाधव यांचे शनिवारी (दि.28) निधन झाले. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबाबत रवि जाधव यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या कुटूंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
गेल्यावर्षी 9 जानेवारी 2021 रोजी रवी जाधव यांचे वडील हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे निधन झाले होते. रवी जाधव यांचे आई-वडील डोंबिवलीत वास्तव्यात होते. वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच त्यांच्या आईचे निधन झाल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रवी जाधव यांचे वडील गिरणी कामगार होते. रवी जाधव यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरुन वारंवार आपल्या आई वाडिलांबाबत माहिती शेअर करायचे.