। मुंबई । वार्ताहर ।
ज्योवीस आयुर्वेदचा 17 वा वर्धापन नुकताच वीर सावरकर सभागृह दादर येथे संपन्न झाला. यावेळेस शुभचिंतक व चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेते अतुल परचुरे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदे, अभिनेत्री प्राची पिसाट, अभिनेत्री नम्रता गायकवाड, अभिनेत्री प्राजक्ता दातार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. ज्योती विजय सातपुते डॉ. राज सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ज्योवीस ने आपल्या रुग्ण सेवेची,विश्वासाची आणि ऋणानूबंधाची सतरा वर्ष यशस्वी पूर्ण करताना आयुर्वेदाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे.
या प्रवासात कित्येक नामवंत व्यक्तीमत्वे तसेच सामान्य नागरिक ज्योवीस शी जुळले आहेत. तसेच ज्योवीस च्या वतीने वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले जाते. ज्योवीसच्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये ज्योवीस इन्स्टिट्यूट ची स्थापना ही महत्वपूर्ण आहे. ही एक अशी संस्था आहे जी सौंदर्य, मेक-अप आणि केशभूषा याचा अभ्यासक्रम शिकवते. कॉस्मेटोलॉजी, क्युपंक्चरिस्ट, आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट, रेकी हीलर इत्यादी अतिरिक्त अभ्यासक्रमांसह त्याचा विस्तार करण्यात आला आहे. ज्यामुळे भविष्यात अशी पिढी घडेल ची आर्युवेदला लोकांपर्यंत पोहचवेल,असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला आहे.